लातूर शहरातील बाबानगर खाडगाव रोड येथे भावानेच आपल्या भावाचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे
शहरातील बाबानगर येथे राहणारा नितीन उर्फ सुभाष आलकुंटे याचे पत्नीसोबत पटत नसल्याने त्याची पत्नी गेल्या तीन वर्षांपासून त्याला सोडून पिंपरी चिंचवड येथे राहते. त्यामुळे नितीन हा दारू पिऊन घरातील सर्वाना नेहमी भांडत होता. काही दिवसांपूर्वी त्याचा मोठा राहुल याच्याशी भांडण झाले होते. तेव्हापासून दोघांचे पटत नव्हते.
काल रात्री या दोन भावात भांडण झाले. यात राहुल याने नितीनच्या पोटात आणि खांद्यावर चाकूचे सपासप वार केले आणि यातच त्याचा मृत्यू झाला. आई लक्ष्मीबाई आलकुंटे यांनी दिलेल्या जवबाबावरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात राहुल आलकुंटे याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक एस एस कराड अधिक तपास करीत आहेत.
0 Comments