उरण : शहरातील चारफाटा येथे दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरानी भर बाजारात २२ वर्षीय तरुणाच्या मानेवर धारदार शस्त्राने वार करीत त्याचा गळा चिरला आहे. हा हल्ला किरकोळ कारणावरून झाला असल्याचे म्हटले जात आहे.
रविवारी रात्री उरण शहरातील चारफाटा येथे दुचाकीवरून आलेल्या दोघांनी ताह गुलजार शेख याच्या वर धारदार शस्त्राने अचानक हल्ला केला. यावेळेस, जखमी ताह शेख यांच्या मानेवर वार झाल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला आहे. त्याच्यावर नवी मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान उरण पोलिसांनी या प्रकरणी रुपेश लल्लन प्रसाद (२२) याला अटक केली असून, यातील एक आरोपी फरार आहे. पोलीसांकडून ताब्यात घेतलेल्या तरुणांची चौकशी सुरू आहे. हा हल्ला किरकोळ वादातून हल्ला केल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे
0 Comments