बहिणीला भेटायला आल्याच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण


आपल्या बहिणीला भेटायला आल्याच्या संशयावरुन भावाने एका तरुणाला मित्रांच्या मदतीने बेदम मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिली.

अमित जीवन गायकवाड  (वय 19, रा. हडपसर) असे अटक  केलेल्या भावाचे नाव आहे.

याप्रकरणी श्रीकांत प्रदीप सूर्यवंशी  (वय 32, रा. टाकळी, कनगरा, जि. उस्मानाबाद) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आम्रपाली नितीन जेटीथोर  आणि नितीन जेटीथोर  यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार हडपसरमधील गांधी चौक येथे शनिवारी रात्री पावणे नऊ वाजता घडला. 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे उस्मानाबाद  येथे राहणारे असून ते शनिवारी पुण्यात आले होते. गांधी चौकातील भाजी मंडई  मध्ये ते शनिवारी रात्री आले होते. यावेळी तेथे अमित गायकवाड याने त्यांना पाहिले. आपल्या बहिणीला भेटायला आले आहेत, असा संशय त्याला आला. त्याने फिर्यादी यांच्या डोक्यात दगडाने मारुन जखमी केले. आम्रपाली व नितीन यांना बोलावून घेतले. तिघांनी मिळून त्यांना हाताने व लाथाबुक्क्याने मारहाण केली. हा प्रकार पाहून त्यांची बहिण तेथे आली. तिलाही मारहाण करुन दोघांना जीवे मारण्याची धमकी दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार शिंदे  अधिक तपास करीत आहेत.

Post a Comment

0 Comments