परदेशातील नोकरीचे आमिष दाखवून विद्यार्थ्याची साडेचार लाखाची फसवणूक करणारे जेरबंद


सक्सेस करिअर कन्सलटन्सीचे जितेश विलास जाधव (वय 40, रा.ठाणे वेस्ट) व राधेशाम मंगळू महाराणा (वय 46 रा. गोरेगाव ईस्ट) असे अटक आरोपीचे नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वारगेट पोलीस ठाण्यात एका विद्यार्थ्याने सक्सेस करिअर कन्सलटन्सीच्या जितेश व राधेशाम यांच्या विरोधात फिर्याद दिली होती की, त्याने व त्याच्या मित्रांना परदेशातील हॉटेलमध्ये प्लेसमेंट देतो असे आमिष आरोपींनी दाखवले होते.

त्यानुसार मार्च 2021 मध्ये त्यांनी आरोपीला 4 लाख 50 हजार रुपये दिले. मात्र, आजपर्यंत आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या मित्रांना नोकरी काही दिली नाही. यावेळी फिर्यादी रक्कम मागण्यासाठी  गेले असता आरोपींनी शिवीगाळ करत त्यांना हुसकावून लावले.

यावेळी पोलिसांनी आरोपींना सापळा रचून वेगवेगळ्या ठिकाणाहून ताब्यात घेतले व त्यांची चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याचे कबुल केले. त्यांच्यावर फसवणूकीचा गुन्हा दाखल केला असून स्वारगेट पोलीस पुढिल तपास करत आहेत.

Post a Comment

0 Comments