भाऊबीजेचा दिवस मुलगा बाईकवर , आई डबलसीट, सुसाट वेगाने बस आली अन्

 


बुधवारी भाऊबीज एकीकडे उत्साहात साजरी केली जात होती. अशातच नागपूरमध्ये एक काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली. नागपुरात बुधवारी दुपारी आई आणि तरुण मुलगा बाईकवरुन जात होती.

यावेळी एका भरधाव बसने  दुचाकीला धडक दिली आणि या धडकेत आईचा जागीच मृत्यूझाला. तर मुलगी जखमी झाला. या घटनेनंतर स्थानिक आक्रमक झाले होते. संतप्त जमावाने यावेळी बसवर दगडफेक केली आणि आपला राग व्यक्त केला. या दुर्दैवी घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जाते आहे.

दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास नागपूरच्या मानेवाडा बेसा मार्गावर ही दुर्दैवी घटना घडली. परिवर्तन चौकात घडलेल्या या घटनेनंतर एकच संपात व्यक्त करण्यात आला. स्टार बसच्या धडकेत दुचाकीवरुन खाली पडलेल्या महिलेच्या मृत्यूने खळबळ उडाली होती. यावेळी रस्त्यावर एकच गोंधळ उडाला.

Post a Comment

0 Comments