परतीच्या पावसाने तालुक्यात धुमाकुळ घातला आहे. मंगळवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास शहरासह तालुक्यातील विविध भागात जोरदार पाऊस झाल्याने पांढरवाडी जवळील ओढ्याच्या पुलावरून पाणी वाहत होते.
उमर वजिर सय्यद ( ४५, हिरडपुरी, पैठण, हल्ली मुक्काम चिकलठाणा औरंगाबाद ) असे थोडक्यात बचावलेल्या व्यक्तीचे नाव आहे. उमर मंगळवारी औरंगाबादहून तालुक्यातील खळेगावं येथील नातेवाईकांना भेटण्यासाठी निघाला होता. दरम्यान, सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास शहरासह विविध भागात जोरदार पाऊस झाल्याने नदी, ओढेनाल्यांना मोठ्या प्रमाणावर पाणी आले होते. शहराजवळ असलेल्या पांढरवाडी ओढ्याला या पावसाने मोठ्या प्रमाणात पाणी आले होते. पाणी पुलावरून वाहत असल्याने दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली होती.
0 Comments