सुतळी बॉम्बवरील स्टील ग्लास फुटून बालकाचा मृत्यू

 


स्टीलच्या ग्लासखाली सुतळी बॉम्ब फोडण्याचा प्रकार मुलाच्या अंगलट आला. सुतळी बॉम्ब फुटून त्यावरील स्टीलच्या ग्लासचे तुकडे मुलाच्या शरीरात घुसून तो गंभीर जखमी झाला.

याध्येच या मुलाचा मृत्यू झाला. दरम्यान, मृत बालकाच्या नातेवाईकांनी शवविच्छेदन न करताच अंत्यसंस्कार केले. यानंतर प्रशासनाच्या सूचनेनुसार मृत बालकाचे प्रेत उकरून बाहेर काढून शवविच्छेदन करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments