तारीख ठरली ! अली फजल आणि रिचा चड्ढा ' या ' दिवशी राजधानीत करणार लग्न ; तर मुंबईत होणार जंगी रिसेप्शन II

 


रिचा आणि अली दोघांच्या नात्याबद्दल सर्वांनाच माहित आहे, त्यामुळे रिचा अलीबरोबरचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. तसंच ती अनेकदा त्यांच्या नात्यावर उघडपणे व्यक्तही होत असते. या दोघांच्या लग्नाची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे. अशातच आता या जोडीच्या लग्नाची तारीख ठरल्याचं कळतंय.


फिल्मीबीट वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, रिचा चढ्ढा आणि अली फजलचे प्री-वेडिंग फंक्शन्स नवी दिल्लीत ३० सप्टेंबरपासून सुरू होणार असून ते २ ऑक्टोबरपर्यंत चालणार आहेत. यानंतर ते ७ ऑक्टोबरला दिल्लीत लग्न करणार आहेत आणि ७ ऑक्टोबरला मुंबईत पोहोचल्यानंतर ते त्यांचे मित्र आणि नातेवाईकांना रिसेप्शन देणार आहेत. या रिसेप्शनमध्ये ३५० ते ४०० लोक उपस्थित राहणार असल्याची चर्चा आहे. रिचा आणि अली लग्नाच्या फंक्शन्समध्ये वेगवेगळ्या आउटफिट्समध्ये दिसणार असून त्यासाठी चार फॅशन डिझायनर्सची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहितीही समोर आली आहे.

दरम्यान, गेल्या महिन्यात तिच्या लग्नाबद्दलच्या प्रश्नाला उत्तर देताना रिचा म्हणाली होती, “मला वाटतं आम्ही या वर्षी लग्न करू. कसं तरी करू, पण नक्की करू. मला फक्त करोनामुळे काळजी वाटत आहे आणि मला जबाबदारीनं वागायचंय. आम्ही चुकीच्या कारणांमुळे चर्चेत राहावं, अशी आमची इच्छा नाही. आम्ही सध्या आपापल्या कामात व्यग्र आहोत, पण लग्नाची तयारी सुरू आहे," असं रिचाने सांगितलं होतं.

दरम्यान, अभिनेत्री रिचा चड्ढा आणि अभिनेता अली फजल ऑक्टोबर महिन्यात लग्न करतील, असं म्हटलं जातंय. गेल्या सात वर्षांपासून दोघे एकमेकांना डेट करत आहेत. २०१३ साली प्रदर्शित झालेल्या 'फुकरे' या चित्रपटाच्या निमित्ताने दोघांची पहिली भेट झाली होती. तेव्हापासूनच दोघांच्या रिलेशनशिपबाबतच्या चर्चा रंगू लागल्या होता. त्यानंतर दोघांनीही त्यांच्या नात्याबद्दल आणि लग्नाच्या निर्णयाबद्दल सांगितलं.

Post a Comment

0 Comments