या स्पर्धेमध्ये महाविद्यालयातील जवळपास दोनशे विद्यार्थ्यांनी आपला उस्फूर्त सहभाग नोंदविला. एकूण स्पर्धकांपैकी बारा स्पर्धकांची विभाग स्तरावरील होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे अशी माहिती आविष्कार चे महाविद्यालयाचे संयोजक डॉ. अभय उत्पात यांनी दिली.
या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यानी ह्युम्यानिटी फाईन आर्ट्स, कॉमर्से मॅनेजमेंट लॉं, इंजिनियरिंग अँड टेक्नॉलॉजी, मेडिकल अँड फार्मसी, प्युअर सायन्स आदि विभागामध्ये विविध प्रकल्प सादर केले. सदर स्पर्धेमध्ये प्रा. अनिल बाबर, प्रा. राहुल पांचाळ, प्रा. योगेश घोडके, प्रा. डॉ एस व्ही एकलारकर, प्रा. दीपक भोसले, प्रा. एस एम लंबे, प्रा. अभिनंदन देशमाने यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
श्री पांडुरंग प्रतिष्ठान चे विश्वस्त रोहन परिचारक, प्राचार्य डॉ एस पी पाटील, कर्मयोगी पॉलीटेक्निक चे प्राचार्य डॉ ए बी कणसे, रजिस्ट्रार जी डी वाळके, उप प्राचार्य प्रा. जगदीश मुडेगावकर, संशोधन अधिष्ठाता डॉ. अभय उत्पात तसेच विभागप्रमुख प्रा. एस एम लंबे,, प्रा. डॉ. एस व्ही एकलारकर, प्रा. अनिल बाबर, प्रा. दीपक भोसले, प्रा. अभिनंदन देशमाने व सर्व प्राध्यापक यांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी सह संयोजक प्रा.दीप्ती कुलकर्णी, प्रा. रमेश हलचेरीकर, प्रा. योगेश माने, प्रा. ए ए शेख, प्रा. सुशील कुलकर्णी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
0 Comments