थेरगावमधून 25 किलो गांजा जप्त

 


राहुल सावन मलके (वय 33, रा. तेलंगाना. मूळ रा. छत्रपती संभाजीनगर) याला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई रमेश खेडकर यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने त्याच्या ताब्यात विक्रीसाठी गांजा बाळगला. पोलिसांना याबाबत माहिती मिळाली असता पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून  24 किलो 224 ग्राम गांजा आणि 10 हजारांचा एक मोबाईल फोन असा एकूण तीन लाख 50 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत

Post a Comment

0 Comments