चिखलिमध्ये अल्पवयीन मुलीचा खून

 



पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिखली येथील 17 वर्षीय मुलगी शनिवार (दि. 1) पासून बेपत्ता होती. त्याबाबत तिच्या आईने (वय 44) मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार चिखली पोलीस ठाण्यात दाखल होती. पोलीस मुलीचा शोध घेत असताना चिखलीमधील घरकुल परिसरातील पडक्या इमारतीमध्ये मुलीचा मृतदेह आढळून आला.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी मुलीचा मृतदेह कुजलेला होता. तिच्या शरीरावर हत्याराने वार केल्याच्या जखमा आढळून आल्या. तिच्यावर लैंगिक अत्याचार झाला आहे का, हे शवविच्छेदन झाल्यानंतर स्पष्ट होईल. धारदार शस्त्राने मुलीवर वार करून खून केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

याप्रकरणी दाखल असलेल्या अपहरणाच्या गुन्ह्यात खुनाच्या गुन्ह्याची कलमवाढ करण्यात आली आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.


Post a Comment

0 Comments