पुणे: व्यावसायिकांची सव्वाकोटीची फसवणुक

 


या प्रकरणी एका व्यावसायिकाने (वय 38, रा. कोणार्क इस्टेट, कॅम्प) बंडगार्डन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी याकुबअली ख्वाजा अहमद ऊर्फ याका (वय 46, रा. हैदराबाद, तेलंगण) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

आरोपी याकुबअली याने व्यावसायिकाला फेब्रुवारी 2022मध्ये किराड चौकातील एका मॉलमध्ये बोलावून घेतले. झायसोल इंटिग्रेटेड सोल्यूशन्स या खासगी वित्तीय संस्थेचे कार्यालय पुण्यात सुरू करायचे आहे. वित्तीय संस्थेकडून कर्ज पुरवठा केला जात असून, या व्यवसायात भरपूर नफा मिळतो. फ्रॅंचाइजी देण्यास मदत करतो, असे आमिष दाखविले.

या आमिषाला बळी पडून व्यावसायिकाने याकुबअली याला वेळोवेळी एक कोटी 34 लाख 54 हजार रुपये दिले. परंतु आरोपीने व्यावसायिकाला फ्रॅंचाइजी दिली नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात  आल्यानंतर व्यावसायिकाने पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

Post a Comment

0 Comments