निगडी: महिलेचा विनयभंग करणाऱ्या तरूणाला अटक

 सनी ज्ञानेश्वर क्षीरसागर (वय 25, रा. अण्णाभाऊ साठे वसाहत, निगडी) अटक आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित महिलेने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला अण्णाभाऊ साठे वसाहत येथे असलेल्या सार्वजनिक शौचालयात गेल्या. तिथून येत असताना सनी याने फिर्यादी महिलेस अश्लील कमेंट केली. तसेच महिलेशी गैरवर्तन करून विनयभंग केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी सनी याला अटक केली आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

Post a Comment

0 Comments