साताऱ्यात भीषण अपघात, एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यु

 सातारा : साताऱ्याच्या कराडमधून अपघाताचं वृत्त हाती आलं आहे. कराडच्या लोहारवाडी येथे भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एकाच कुटुंबातील तीन जण जागीच ठार झाले आहेत.

तर एक जण जखमी झाला आहे. या अपघाताने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, साताऱ्यातील लोहारवाडी, कराडमधून अपघाताची धक्कादायक घटना घडली आहे. पुण्याहून शाहूवाडीकडे जात असताना ट्रॅक्टर आणि रिक्षाची समोरासमोर धडक झाली. या धडकेत एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एक युवक जखमी झाला आहे.

या अपघातानंतर लोहारवाडी परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अपघात  झाल्यानतंर परिसरात स्थानिक नागरिक मदतीसाठी धावले. तर घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस देखील घटनास्थळी पोहोचले.

ट्रॅक्टर आणि रिक्षाच्या अपघातात सुवर्णा सुरेश महारुगडे, सुरेश सखाराम महारुगडे, आणि समीक्षा सुरेश महारुगडे हे जागीच ठार झाले आहेत. तर समर्थ सुरेश महारुगडे हा युवक जखमी झाला आहे. जखमी युवकावर कराडच्या कृष्णा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या अपघातात तिघांचा मृत्यू झाल्याने महारुगडे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तर महारुगडे कुटुंब राहत असलेल्या परिसरात शांतता पसरली आहे. राज्यातील वाढते अपघात नागरिकांच्या चितेंचा विषय ठरला आहे.

एका बसने दोन दुचाकीस्वारांना उडवल्याची घटना घडली आहे. नाशिक - त्रंबकेश्वर रस्त्यावर ही बस उलटल्याची घटना घडली. या अपघातात एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. तर चार जण जखमी झाले आहेत. या अपघातानंतर परिसरात एक खळबळ उडाली.

नाशिक- त्रंबकेश्वर रस्त्यावर प्रवासी बस उलटून अपघात झाल्याची घटना घडली आहे. टायर फुटल्याने फुटल्याने बस बेळगाव ढगाजवळ उलटली. या अपघातात दोन दुचाकीस्वारांना बसने उडवले आहे.

या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. तर या अपघातात एकूण चार जण जखमी झाले आहेत. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. त्यानंतर अपघातात जखमी झालेल्यांना उपचारासाठी जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Post a Comment

0 Comments