पत्नी आणि आठ वर्षाच्या मुलाचा खून करून पतीची आत्महत्या

 


पुणे : पत्नी आणि आठ वर्षाच्या मुलाचा खून करून ४४ वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना औंध परिसरात घडली. हा प्रकार बुधवारी दुपारी उघडकीस आला. सुदीप्तो गांगुली (वय ४४, रा.औंध) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे.

तो टीसीएस कंपनीमध्ये कामाला होता. त्याने पत्नी प्रियंका (वय ४०, रा. औंध) आणि मुलगा तनिष्क यांचा खून करून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज चतुःश्रृंगी पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे तिघेजण हरविल्याची तक्रार चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात मंगळवारी रात्री दाखल झाली होती. गांगुली हा मंगळवारी रात्री फोन उचलत नव्हता.

त्यामुळे त्याच्या बंगळुरू येथील भावाने मित्रांकरवी मंगळवारी रात्री सुदिप्तो, त्याची पत्नी आणि मुलगा हरविल्याची तक्रार चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात दिली. बुधवारी सकाळी सुदिप्तोचा भाऊ पुण्यात आला. पोलिसांनी दुपारी सुदिप्तो गांगुली यांचे औंध परिसरातील घर गाठले.

त्यावेळी त्यांना घरात तिघांचे मृतदेह आढळून आले. सुदिप्तोच्या मुलाच्या आणि पत्नीच्या तोंडाला पॉलिथीनची बॅग बांधलेली दिसून आली. या घटनेमागील कारण समजू शकले नाही. याबाबत माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून, या घटनेची माहिती घेत आहेत.

Post a Comment

0 Comments