पुणे: ड्युटीवर उशीरा पोहोचल्याने पोलिसाची होमगार्डला मारहाण

 


पुणे : सातारा जिल्ह्यात होमगार्डला एका पोलिसाने मारहाण केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. या घटनेने गृहरक्षक दलात प्रचंड नाराजी असून संबंधित पोलीस कर्मचाऱ्या विरोधात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे तक्रार अर्ज करूनही कोणतीच कारवाई केली जात नाही.

त्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.

प्रशांत पतंग देशमुख सनद नंबर ८८१७ असे मारहाण झालेल्या होमगार्डचे नाव आहे, तर पोलीस हवालदार रजपूत याने त्यांना मारहाण केल्याचा आरोप आहे.

 याबाबत होमगार्ड प्रशांत देशमुख यांनी दिलेल्या तक्रार अर्जात म्हटले आहे, की २१ मार्च रोजी सकाळी त्यांना तासवाडे टोलनाक्यावर नेमणूक होती. त्या ठिकाणी जायला वाहन न मिळाल्यामुळे कर्तव्यावर पोहोचण्यास त्यांना उशीर झाला.

मात्र, वेळेत न पोचल्यामुळे हवालदार रजपूत याने होमगार्ड प्रशांत देशमुख यांना 'तुझ्या बापाचा नोकर आहे का?' अशी शिवीगाळ करून दमदाटी करीत कानशिलात लगावली. या प्रकाराने गृहरक्षक दलामध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.


Post a Comment

0 Comments