शिरूरमध्ये चोरटयांनी फोर व्हीलरमधील 2 लाख रूपये केले लंपास

 


शिरुर : शिरूर शहरातील पोस्ट ऑफीस समोर उक्कडगाव ता. श्रीगोंदा येथील लेबर कॉन्ट्रक्टर मंगेश विठठल महाडिक यांच्या पार्क केलेल्या फोर व्हीलर गाडीतून अज्ञात चोरट्याने २ लाख रुपये लंपास केले आहे.

याबाबत सविस्तर हकीकत अशी की, (दि. ९) मार्च रोजी दुपारी ३: ३० वा. ते रात्री 9: ४५ वाजल्याच्या दरम्यान शिरूर शहराच्या हद्दीत शिरुर पोष्ट ऑफीस शेजारी फोर व्हीलर गाडी पार्क करून गाडीमध्ये २,०००००/- रुपये गाडी लॉक करून गाडीमध्ये पुढील दोन सिटामधे पिशवीत ठेवुन वरून कपड्याने झाकुन ठेवले होते. ती रक्कम कोणीतरी अज्ञात चोरटयांनी गाडीतून चोरून नेली आहे.

याबाबत शिरूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून या घटनेचा पुढील तपास पोलिस नाईक विनोद मोरे हे करत आहे. शिरूर शहरात चोरट्यांच्या सुळसुळाट झाला असून वारंवार शहरात चोऱ्या होत आहे. या चोरट्यांना गजाआड करण्याचे आव्हाण शिरूर पोलिसांपुढे उभे ठाकले आहे.


Post a Comment

0 Comments