आईवडील लहान भावाचाच लाड करतात , रागातून केली भावाची हत्या

 


कणकवली: दोन भावांमध्ये झालेल्या वादातून एका भावाने धारदार चाकूने भोसकून भावाचा खून केल्याची धक्कादायक घटना कणकवली तालुक्यातील कुंभवडे चिरेखणवाडी येथे काल, बुधवारी रात्री घडली.

यात स्टनी अंतोन डिसोझा (वय-३५, कुंभवडे, चिरेखणवाडी) हा तरुण ठार झाला. घटनेनंतर कुंभवडे मधील अनेकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती.

याप्रकरणी आरोपी आयसीन अंतोन डिसोजा (३७, कुंभवडे, चिरेखणवाडी) याच्यावर कणकवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मार्टिन अंतोन डिसोजा यांनी याबाबत तक्रार दिली असून, घटनेतील मृत व आरोपी हे तक्रादाराचे मुलगे आहेत. आई व वडील लहान मुलगा असलेल्या मृत स्टनी याचे जास्त लाड करतात. या रागातून संशयित आरोपी आयसीन अंतोन डिसोजा यांने घरातील चाकूने भोसकून भाऊ स्टनी याचा खून केला. या घटनेने सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. अधिक तपास पोलिस करीत आहेत.


Post a Comment

0 Comments