जालना: पत्नी प्रियकरासोबत पळून गेली जावयाने सासऱ्यावर गोळ्या झाडून केली हत्या

 


पत्नी प्रियकरासोबत पळून गेल्याचा राग अनावर झाल्याने जावयाने सासऱ्यावर गोळ्या झाडून भरदिवसा निर्घृण हत्या केल्याची घटना घडली आहे. जालना जिल्ह्यातील अंबड शहरात आज 29 मार्च रोजी घडली.

जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील रामगव्हाण येथील मूळ रहिवासी असलेल्या व सध्या आडुळ आणि नंतर पाचोड येथे स्थायिक झालेल्या किशोर शिवदास पवार या इसमाचे त्याचा मामा पंडित भानुदास काळे (शारदानगर, अंबड) यांच्या मुलीसोबत लग्न झाले होते. किशोर पवार यांना चार अपत्ये असून संसाराचा गाडा बऱ्यापैकी सुरू होता. त्यातच, मुलांना सोडून किशोर त्यांची पत्नी काही दिवसापूर्वी पाचोड येथील प्रियकरासोबत पळून गेली आहे.आपला सासरा पंडित काळे याने चिथावणी दिल्यानेच पत्नी पळून गेल्याचा संशय किशोर पवार यास होता.याच रागातून आज सकाळी किशोर पवार याने अंबड येथे येऊन सासऱ्यावर भरदिवसा गावठी पिस्तुलातून थेट डोक्यात दोन गोळ्या झाडल्या.सासरा जमिनीवर कोसळून गतप्राण होतांच गावठी पिस्तूलासह किशोर फरार झाला आहे.

अंबडचे पोलीस निरीक्षक शिरीषकुमार हुंबे यांनी तातडीने घटनास्थळ गाठून मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात हलविला आहे. आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची पथके विविध ठिकाणी रवाना झाली आहेत.


Post a Comment

0 Comments