पुणे: विवाहीत तरूनासोबत प्रेमप्रकरण: लग्नास नकार दिल्याने तरुणीची आत्महत्या

 


प्रियंका यादव (वय 21, रा. उत्तमनगर) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुरींदर सिंग (वय 36, रा. एनडीए क्वॉर्टर, खडकवासला) याला अटक केली आहे. याप्रकरणी उत्तमनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 25 मार्च रोजी सकाळी साडेदहा वाजता घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणी नामांकित महाविद्यालयत शिक्षण घेत होती. ती एनडीएत मुलांच्या घरी जाऊन एक वर्षापासून क्लास घेत होती. दरम्यान, गुरींदर याच्या देखील मुलीला ती शिकवण्यासाठी जात होती. त्याने तरुणीशी प्रेमाचे नाटक केले. तिला लग्न करतो असे आमिष दाखविले.

परंतु, लग्नाबाबत विचारले असता लग्नाला नकार दिला. त्यामुळे तरूणी या नैराश्यात होती. चार दिवसांपुर्वी (दि.25 मार्च) ती सकाळी उठली व साडेदहा वाजता आंघोळ करण्यासाठी बाथरुममध्ये गेली. बराच  वेळ झाला तरी बाहेर न आल्याने तिच्या आईने दरवाजा वाजविला, तरी तिने प्रतिसाद दिला नाही.

तेव्हा फिर्यादीने दरवाजा तोडला असता तिने पाण्याची टाकी ठेवण्यासाठी तयार केलेल्या लोखंडी अँगलला ओढणीने गळफास घेतल्याचे आढळून आले. पुढील तपास पोलीस करत आहेत.

Post a Comment

0 Comments