कोल्हापूर: ८लाखांची लाच घेताना सहायक पोलिस निरीक्षक अन् कॉन्स्टेबलला रंगेहाथ अटक

 


कोल्हापूर - जुना राजवाडा पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलिस निरीक्षक नागेश म्हात्रे आणि पोलिस कॉन्स्टेबल रुपेश कुंभार या दोघांना आठ लाख रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.

सांगली आणि कोल्हापूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शुक्रवारी (दि. १०) मध्यरात्रीनंतर अडीच वाजता जुना राजवाडा पोलिस ठाण्यातच ही कारवाई करण्यात आली.

या घटनेमुळ कोल्हापूर पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे. अँटी करप्शन विभागाने या दोघांना ताब्यात घेतल्यानंतर सहायक पोलिस निरीक्षक नागेश म्हात्रे याची तब्येत बिघडल्याने त्याला उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले आहे, तर पोलिस कॉन्स्टेबल रुपेश कुंभार याला कोल्हापुरातील अँटी करप्शनच्या कार्यालयात नेण्यात आलंय. गेल्या वर्षाच्या सुरुवातीलाच स्थानिक गुन्हे शाखेतील दोघा जणांना दहा लाख रुपयांची लाच घेताना अँटी करप्शन विभागाने रंगेहाथ पकडले होतं. त्यांनतर पुन्हा जुना राजवाडा पोलिस ठाण्यातच आठ लाख रुपयांची लाच स्वीकारताना दोघांवर कारवाई झाल्याने खळबळ उडाली आहे.


Post a Comment

0 Comments