देवळाली येथुन 2 मुलींचे अपहरण

 


राहुरी : राहुरी शहरासह देवळाली प्रवरा परिसरातून दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण झाल्याने खळबळ उडाली आहे. पहिल्या घटनेत 16 वर्षीय अल्पवयीन मुलगी (दि.2) फेब्रुवारी रोजी सायंकाळी घरातून अचानक गायब झाली, मात्र तिचे कोणीतरी अपहरण केल्याचा संशय असल्याने वडिलांनी पोलिसात अपहरण झाल्याची फिर्याद दिली आहे.

अल्पवयीन मुलगी आई- वडिलांबरोबर राहते. (दि.2) फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5ः30 वाजेच्या दरम्यान मुलीचे आई- वडील घराबाहेर कामानिमित्त गेले होते. यावेळी अपहृत मुलीसह मोठी बहीण दोघीच घरात होत्या. लहान 16 वर्षीय बहीण कोणाला काहीही न सांगता घरातून बाहेर गेली. आई, वडील घरी आले असता त्यांनी तिचा शोध घेतला, मात्र ती सापडली नाही. तिचे कोणीतरी अपहरण केल्याची त्यांची खात्री झाली. वडिलांनी राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पो. नि. मेघशाम डांगे व पो. ना. सुशांत दिवटे करीत आहेत.

दुसर्‍या घटनेत तालुक्यातील देवळाली प्रवरा परिसरात इ. 8 वीमध्ये शिकणारी 14 वर्षीय अल्पवयीन मुलगी घरातून शाळेत गेल्यांनतर तिचे अपहरण करण्यात आले. ही घटना दि. 31) जानेवारी रोजी घडली. अल्पवयीन मुलगी देवळाली प्रवरा परिसरात आई- वडिलासह राहते. (दि.31) रोजी सकाळी 11 वाजेचे सुमारास शाळेमध्ये जाते, असे सांगुन घरातून गेली. सायंकाळपर्यंत मुलगी घरी आली नाही. आई-वडिलासह नातेवाईकांना ती सापडली नाही. अज्ञात इसमाने मुलीस पळवुन नेले आहे, वडिलांनी राहुरी पोलिसात फिर्याद दिली. अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पो. नि. मेघशाम डांगे करीत आहेत.


Post a Comment

0 Comments