एका किरकोळ वादातून 20 वर्षीय तरुणाची हत्या

 


अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. एका शुल्लक कारणावरून हि हत्या झाल्याने सगळीकडे संताप व्यक्त केला जात आहे.

लहान मुलाने दुचाकीला सायकल आडवी घातल्याच्या किरकोळ वादातून हि हत्या करण्यात आली आहे. याप्रकरणी राहाता पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी या प्रकरणी एका आरोपीला अटक केली असून त्याच्या बाकी साथीदारांचा शोध सुरु आहे. 

राहाता शहारानजीक पंधरा चारी शिवारात शनिवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास 20 वर्षीय रोहित वर्मा या तरुणाच्या दुचाकीला शेजारी राहणाऱ्या कुटुंबातील लहान मुलाने सायकल आडवी घातली होती. यामुळे किरकोळ वाद झाला. या किरकोळ वाद पुढे वाढत गेल्याने संबंधित लहान मुलाचा मोठा भाऊ अरबाज शेख याने आपल्या साथीदारांच्या मदतीने रोहित याला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. 

यानंतर आपल्याला होणाऱ्या मारहाणीपासून वाचण्यासाठी रोहित वर्मा हा बाजूच्या शेतात पळाला असता आरोपी अरबाज आणि साथीदारांनी पाठलाग करत रोहितवर धारदार शस्राने वार करून त्याची हत्या केली. एका छोट्या कारणावरून झालेल्या या हत्येमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी राहाता पोलीस ठाण्यात भादंवी कलम 302, 323, 324, 334 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणातील मुख्य आरोपी अरबाज शेख याला अटक केली असून त्याच्या बाकी साथीदारांचा शोध सुरु आहे.


Post a Comment

0 Comments