टाकळी रोडवर 34 लाखांची घरफोडी

 


जुने नाशिक : अनसूया नगर टाकळी रोड येथील प्रशांत खडताळे यांच्या फ्लॅटमध्ये घरफोडी झाल्याचा प्रकार घडला. सुमारे ३४ लाख ७० हजारांचा ऐवज चोरीस गेला आहे. मंगळवारी (ता.२१) भद्रकाली पोलिस ठाण्यात अज्ञात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

खडताळे कुटुंबीय आणि चार मित्रांसह कोलकत्ता येथे १५ फेब्रुवारीला दर्शनासाठी गेले होते. १९ फेब्रुवारीला परतीच्या मार्गावर असताना सोमवारी (ता. २०) त्यांच्या मोलकरणीने घरफोडी झाल्याची माहिती फोनवरून दिली.

मंगळवारी खडताळे कुटुंबीय घरी परतले. कपाटामध्ये ठेवलेली ३४ लाखांची रोख रक्कम आणि ७० हजारांच्या सोन्याच्या दोन अंगठ्या आढळून आल्या नाही. गुन्हे शोध पथक अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली.

शेजारी तसेच खडताळे कुटुंबीयांची चौकशी केली. त्यानंतर उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहाय्यक आयुक्त डॉ. सिद्धेश्वर धुमाळ, वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्ता पवार यांनी घटनास्थळास भेट दिली. श्री. खडताळे यांनी सध्या राहत असलेला फ्लॅट खरेदी केला होता.

त्याची रक्कम देण्यासाठी इतक्या मोठ्या प्रमाणात रक्कम घरात आणून ठेवल्याचे त्यांनी सांगितले. घरात रक्कम ठेवली असल्याचे कुणासही माहीत नसल्याचेही सांगण्यात आले. पोलिस परिसरातील नागरिकांची चौकशी करत आहे. तसेच सीसीटीव्ही फुटेज प्राप्त करण्याचा प्रयत्न सुरू आहे.


Post a Comment

0 Comments