नवरीवर नोटांची नाही तर बंडलांची केली ' बरसात, व्हायरल झाला' श्रीमंत नातेवाईक,

 


काही दिवसांआधीच सोशल मीडियावर नोटा उडवण्याचे बरेच व्हिडीओ समोर येत आहेत.

कुणी आपल्या घरातील एखाद्या कार्यक्रमात पैसे लुटवत आहेत तर कुणी लग्नात पैसे उडवत आहेत. असाच एका लग्नातील एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. यात एक नातेवाईक नवरीला आशीर्वाद देताना तिला फक्त पैसे नाही तर नोटांची बंडलं देत आहे.

हा व्हिडीओ एका यूजरने ट्विटरवर शेअर केला आहे. या यूजरने गंमतीने कॅप्शन दिलं की, 'या व्यक्तीला कुठूनतरी शोधून आणा राव, त्याच्याकडून ग्रुपची दृष्ट काढून घ्यायची आहे'. व्हिडिओत तुम्ही बघू शकता की, काळा चष्मा लावलेली एक व्यक्ती नवरी-नवरदेवाच्या मागे उभी आहे. तो दोघांनाही आशीर्वाद देत आहे.

आशीर्वाद देताना त्याच्या हातात नोटांचे बरेच बंडल आहेत. असं दिसत आहे की, त्याच्या हातात एक लाख रूपयांपेक्षा जास्त असेल. पण हे स्पष्ट होऊ शकलं नाही की, त्याच्याकडे किती पैसे होते. पण बऱ्याच लोकांनी अंदाज लावला की, ते 1 लाख रूपये असतील.

व्यक्तीने एक-एक करून बंडल नवरी आणि नवरदेवाकडे दिले. त्याने जास्त बंडलं नवरीला दिलीत. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत असून लोक यावर अनेक मजेदार कमेंट्स करत आहेत.

Post a Comment

0 Comments