धक्कादायक: सोडुन गेलेल्या तरूणीचा पत्रात उल्लेख करत तरुणाची आत्महत्या

 


नवी मुंबईमधील वाशी या ठिकाणी प्रेमप्रकरणातून एका व्यक्तीने आत्महत्या  केल्याची घटना उघडकीस आली आहे.

व्यक्तीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. निलेश सत्यवान सर्वेदे (वय 35 वर्ष) असे आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. निलेशने प्रेम प्रकरणातून हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. वाशी पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. 


निलेश सर्वेदे हा वाशी गावातील एका इमारतीत भाड्याच्या खोलीत आपल्या पुतण्यासोबत राहत होता. तो हाऊसकिपिंगचे काम करत होता. घटनेच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी सकाळी निलेशचा पुतण्या घराच्या बाहेर गेला होता. यावेळी निलेश घरामध्ये एकटाच होता. याच संधीचा फायदा घेत निलेशने आपल्या आयुष्याचा शेवट केला. मानखुर्द येथे राहणारा निलेशचा भाऊ दिनेश हा त्याच्या मोबाईलवर सतत कॉल करत होता. मात्र तो फोन उचलत नव्हता. त्यामुळे त्याला संशय आला यानंतर तो आपल्या भावाला पहाण्यासाठी वाशी गाव येथे आला तेव्हा निलेश घरातील किचनमध्ये गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला. 

या घटनेची माहिती मिळताच वाशी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
त्यानंतर पोलिसांनी त्याचा मृतदेह रुग्णालयात पाठवून दिला.
यादरम्यान पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असता त्यांना निलेशने मृत्यूपूर्वी लिहून ठेवलेली चिठ्ठी
सापडली असून त्यात त्याने त्याच्या सोबत राहण्यास असलेल्या व त्याला सोडून गेलेल्या महिलेचा उल्लेख केला आहे.
त्यामुळे निलेशने प्रेम प्रकरणातून आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
वाशी पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.


Post a Comment

0 Comments