भावाने फसवणुक केल्यामुळे तरूणाने व्हॉट्सअप स्टेटस ठेवत उचलले ' हे, पाऊल

 


सातारा: आपल्या हातात पैसा आला कि आपण सगळं काही विसरतो अगदी रक्ताची नातीसुद्धा विसरतो.

अशीच एक घटना सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यामध्ये घडली आहे. सैन्य दलात भरती करण्याच्या अमिषाने फसवणूक  झाल्याने एका तरुणाने गळफास घेऊन आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. कराड तालुक्यातील कोळे या गावामध्ये हि धक्कादायक घटना घडली आहे. दयानंद बाबुराव काळे असे आत्महत्या  करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. त्याने आपल्या मोबाईलमधील व्हाट्सअपवर स्टेटस ठेवत गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या प्रकरणी कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा  दाखल करण्यात आला आहे. सैन्य दलात जवान असलेला त्याचा चुलत भाऊ प्रदीप विठ्ठल काळे याला या प्रकरणी अटक  करण्यात आली आहे.


Post a Comment

0 Comments