एक चुक अन् शेतकरी महिलेचा भयानक मृत्यू , अख्ख गाव हळहळलं

 



नेहाल भुरे,: तातील उडीद पिकाची मळणी सुरू असताना मळणी यंत्रात साडी सापडून एका महिलेचा गुरफडून मृत्यू झाल्याची दूर्दैवी घटना भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील दोनाड येथे घडली

घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शीतल धर्मशील कोचे वय 52 वर्ष असे मृतक महिलेचे नाव आहे. सध्या भंडारा जिल्ह्यात उडीद,सोयाबीन,वाटाणा,हरभरा अशा विविध पिकांची काढणी करून त्याची मळणी करणे सुरू आहे.  अशातच शीतल धर्मशील कोचे यांच्या स्वतःच्या शेतातील उडीद पिकाची मळणी करण्यासाठी रुपचंद बगमारे यांची ट्रॅक्टर सह मळणी यंत्र सुरू होते.

यावेळी शीतल मळणी यंत्र आणि ट्रॅक्टरच्या मधोमध उभी असताना तिची साडी लोखंडी सॉफ्टिंगला अडकून त्यात गुरफडल्याने शितलचा जागीच मृत्यू झाला. सदर घटनेची माहिती गावात पोहचताच ग्रामस्थांनी घटनास्थळाकडे एकच गर्दी केली. लाखांदूर पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचून पंचनामा केला. यावेळी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले असून लाखांदूर पोलीस पुढील तपास करीत आहेत. शीतलच्या मृत्यूने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.


Post a Comment

0 Comments