बहिणीच्या लग्नाच्या दोन दिवस आधीच भावावर काळाचा घाला , वर्धनगड घाटात डंपर- दुचाकी धडकेत तरुण ठार

 


कोरेगाव तालुक्यातील वर्धनगड घाटातील रामोशीवाडी गावच्या हद्दीत डंपर आणि दुचाकीची धडक झाली. या अपघातात गणेश दिलीप भोसले (वय 27, रा. वडाचीवाडी, ता. कोरेगाव) या युवकाचा मृत्यू झाला, तर आजी गंभीर जखमी झाली.

गणेश हा आपल्या बहिणीच्या विवाहासाठी आजीला घरी घेऊन जात असताना अपघात झाला. एकीकडे घरी लग्नाची घाई असताना या अपघातामुळे भोसले कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.

गणेशची बहीण नीलम भोसले हिचा मंगळवारी (दि. 7) विवाह होता. त्याची तयारी घरामध्ये सुरू होती. विवाहासाठी गणेश हा त्याच्या आजीला आणण्यासाठी ललगुण (ता. खटाव) येथे गेला होता. ललगुणवरून दुचाकीने गणेश व त्याची आजी वडाचीवाडीकडे येत होते. गणेश हा वर्धनगड घाटात आला असता, रामोशीवाडी गावच्या हद्दीत दुचाकी आणि डंपरची धडक झाली. यामध्ये गणेशचा जागीच मृत्यू झाला. तर, आजी गंभीर जखमी झाली आहे. याप्रकरणी डंपरचालक अविराज संभाजी जाधव (रा. नडवळे, ता. खटाव) यांनी याबाबतची फिर्याद कोरेगाव पोलीस ठाण्यात दिली.


Post a Comment

0 Comments