प्रेमाच्या जाळ्यात ओढून अल्पवयीन मुलीवर अत्याचार....

 


पुणे अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. पीडित मुलगी गर्भवती  राहिल्याने हा प्रकार उघडकीस आला आहे.

याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार सप्टेंबर 2022 मध्ये घडला आहे.

याबाबत पीडित मुलीच्या 52 वर्षीय आईने अलंकार पोलीस ठाण्यात  फिर्य़ाद दिली आहे. त्यानुसार हर्षल सत्यम जाधव (रा. गणेशनगर, सातचाळ) याच्याविरुद्ध आयपीसी 376 (ii) (n), पॉक्सो  ॲक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला आरोपीने प्रेमाच्या जाळ्यात ओढले.
तिचा विश्वास संपादन करुन तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापीत केले.
पीडित तरुणी गर्भवती राहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
पीडित तरुणीच्या आईन दिलेल्या तक्रारीवरुन आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.


Post a Comment

0 Comments