पुणे - नगर रस्त्यावर गंभीर अपघातात एकाच कुटुंबातील चार जण मृत्युमुखी

 शिरुर (तेजस फडके): कारेगाव येथील फलकेमळा येथे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरला कारची धडक बसल्याने एकाच कुटुंबातील चार जणांचा गंभीर जखमी झाल्याने मृत्यू झाला असुन त्यात आजी, आजोबा, सुन आणि नात यांचा समावेश आहे.

याबाबत अश्विन सुदाम भोंडवे (वय 35 वर्षे) रा. डोमरी, ता.पाटोदा, जि. बीड यांनी रांजणगाव MIDC येथे फिर्याद दाखल केली आहे.

रांजणगाव MIDC पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आज (दि. 21) रोजी अश्विन भोंडवे हे बीड वरुन चाकण येथे आपल्या पाहुण्याकडे नगर-पुणे रोडने पुणे बाजुकडे जात असतांना कारेगावच्या हद्दीतील फलकेमळा येथील “हॉटेल महागणपती” समोरुन दुपारी 12:30 च्या सुमारास रोडवर डाव्या बाजूस उभ्या असलेल्या कंटेनर क्र. MH 43 BG 2776 यास पाठीमागुन कार जावुन धडकल्याने अपघात झाला.

त्यात अश्विन भोंडवे यांचे वडील 1) सुदाम शंकर भोंडवे (वय 65 वर्षे) आई 2) सिंधुबाई सुदाम भोंडवे (वय 55 वर्षे), पत्नी 3) कार्तीकी अश्विन भोंडवे (वय 35 वर्षे) , मुलगी 4) आनंदी अश्विन भोंडवे (वय 2.5 वर्षे) सर्व रा. डोमरी, ता. पाटोदा, जि. बीड यांना गंभीर मार लागल्याने त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. अश्विन भोंडवे यांनाही किरकोळ दुखापत झाली असुन कंटेनर चालक नामे बबलु लहरी चव्हाण (रा.कुनगाईखुर्द, पो. इटवा कुनगाई, थाना-पैकोलिया, ता. हरय्या, जि. बस्ती, उत्तर प्रदेश) याच्या विरुध्द भोंडवे यांनी रांजणगाव MIDC पोलिस स्टेशन मध्ये कायदेशीर फिर्याद दाखल केली असुन पुढील तपास रांजणगाव पोलिस करत आहेत.


Post a Comment

0 Comments