अज्ञात वाहनाच्या धडकेत युवकाचा मृत्यू

 


शिक्रापूर (ता. शिरुर) येथील शिक्रापूर चाकण रस्त्यालगत हॉटेल पुर्णब्रम्ह वडापाव सेंटरचे समोर महिंद्रा सुप्रो कारला अज्ञात वाहनाची धडक बसून झालेल्या अपघातात साजिद मुनावर पठाण या युवकाचा मृत्यू झाला असून शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिक्रापूर (ता. शिरुर) येथील शिक्रापूर चाकण रस्त्याने साजिद पठाण हा युवक त्याच्या ताब्यातील महिंद्रा सुप्रो कार घेऊन चाललेला असताना हॉटेल पुर्णब्रम्ह वडापाव सेंटरचे समोर समोरुन चाकण बाजूने आलेल्या अज्ञात वाहनाची पठाणच्या वाहनाला धडक बसून अपघात झाला. या अपघातात साजिद मुनावर पठाण (वय २२) रा. पाबळ रस्ता लोणी मावळा जि. अहमदनगर हा गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला.

याबाबत उमेश आसाराम महारनवर (वय २३) रा. काळे कॉलनी, काटे वस्ती आळंदी मुळ रा. पावर हाउस जवळ कोतन ता. पाटोदा जि. बीड यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात वाहन चालकावर गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेश माळी हे करत आहे.


Post a Comment

0 Comments