निमगाव म्हाळुंगी एका व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या.....

 


शिक्रापूर (शेरखान शेख): निमगाव म्हाळुंगी (ता. शिरुर) येथील अजय सोपान रणसिंग या इसमाच्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली असून शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

निमगाव म्हाळुंगी (ता. शिरुर) येथील अजय रणसिंग हे २५ फेब्रुवारी रोजी घरी असताना रात्रीच्या सुमारास त्यांची पत्नी घरात आली असता तिला पती अजय यांनी साडीने गळफास घेतल्याचे दिसून आले. दरम्यान त्यांच्या नातेवइकांनी अजय यांना खाली घेत हॉस्पिटल मध्ये नेले असता तेथील डॉक्टरांनी अजय सोपान रणसिंग (वय ३८) रा. निमगाव म्हाळुंगी (ता शिरुर) जि. पुणे यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.

याबाबत संतोष जयसिंग रणसिंग रा. निमगाव म्हाळुंगी (ता शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे खबर दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी आकस्मात मृत्युची नोंद केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार किशोर तेलंग हे करत आहे.


Post a Comment

0 Comments