देवीच्या दर्शनाला जाताना घाटात भीषण अपघात , 1 ठार तर 6 जखमी

 


पुणे- बंगलोर महामार्गावर खंडाळा घाटाजवळ भीषण अपघात झाला आहे. ड्रायव्हरचा गाडीवरील ताबा सुटल्यामुळे हा अपघात झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

अपघातात 1 जण जागीच ठार तर 2 जण जमीर तर ४ जण किरकोळ जखमी झाले आहेत. लोणी (ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर ) येथील राजेंद्र साबळे (वय- 40) यांचा जागीच मृत्यू झाला.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, सातारा जिल्ह्यातील मांढरदेवीचे दर्शन घेण्यासाठी निघालेल्या भाविकांच्या गाडीला अपघात झाला. ड्रायव्हरचा ताबा सुटल्यामुळे खंडाळा घाटाजवळ काच कंपनी शेजारी चार चाकी गाडीचा (MH-16-CD-1488) अपघात झाला आहे. या अपघातात छोटा हत्ती गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. मुख्य रस्त्यावरून हि गाडी बाजूला पलटी झाली आहे.

मुंबईवरून मांढरदेवीचे दर्शन घेण्यासाठी भाविक निघाले होते. खंडाळा घाटाजवळ आज हा अपघात झाला. यामध्ये 1 जण ठार तर 6 जण जखमी झाले आहेत. राधाबाई साबळे, सुभद्रा साबळे, विजया साबळे, सुनीता गायकवाड ( सर्व राहणार लोणी, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर ) या गंभीर जखमी झाल्या आहेत. एका जखमीचे नाव मात्र समजू शकले नाही. या सर्वांना खंडाळा येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. अपघाताची माहिती मिळतात पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.


Post a Comment

0 Comments