तरूणीचा विनयभंग करणाऱ्या कार चालकावर गुन्हा

 


याप्रकरणी पीडित तरुणीने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार एमएच 14/ईसी 3732 क्रमांकाच्या कार चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी महाविद्यालयातून घरी जात असताना ती जगताप डेअरी येथील उड्डाण पुलावरून जात असताना एका कारमधून आलेल्या चालकाने तरुणीकडे पाहून अश्लील हावभाव करत तिचा विनयभंग केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

Post a Comment

0 Comments