निवडणूक अधिकाऱ्यांनी जप्त केली 43 लाखांची रोकड

 


चिंचवड विधानसभा मतदार संघाची पोटनिवडणूक सुरु आहे. माघारीच्या मुदतीनंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून 28 उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे आता प्रचाराला जोरदार सुरू झाली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर निवडणूक विभागाने विविध पथके अॅक्‍टीव्ह केली आहेत.

पोट निवडणूकीत पैशांचे वाटप होऊ नये, यासाठी चिंचवड विधानसभा मतदार संघातील विविध भागात 'स्टॅटिक सर्व्हिलन्स' पथकांकडून वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे. आज (शुक्रवारी) दुपारी दळवीनगर येथे एका मोटारीतून काही जण पैसे घेऊन जात होते.

या मोटारीची निवडणूक विभागाच्या स्टॅटिक सर्व्हिलन्स पथकाने कसून तपासणी केली असता 43 लाखांची रोकड आढळून आली. या पैशांबाबत संबंधितांकडे चौकशी केली असता हे पैसे एका लॅबचे असल्याचे प्राथमिकदृष्ट्या समोर आले. मात्र, नियमाप्रमाणे हे पैसे आयकर विभागाकडे जमा करण्यात आल्याची माहिती' स्टॅटिक सर्व्हिलन्स' पथकातील अधिकाऱ्यांनी दिली.

Post a Comment

0 Comments