पिंपरी : शहरातून दोन दुचाकी चोरीला

 अब्दुल महम्मद खालीद चौधरी (वय 28, रा. मोरवाडी, पिंपरी) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी चौधरी यांनी त्यांची 15 हजार रुपये किंमतीची दुचाकी (एमएच 14/एडब्ल्यू 6614) मोरवाडी येथील एका हॉटेल समोर पार्क केली. पाऊण तासात त्यांची दुचाकी चोरीला गेली. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

अवघ्या वीस मिनिटात दुचाकी चोरीला कासारवाडी येथील एका हॉटेल समोरून दुचाकी चोरीला गेली. ही घटना 8 फेब्रुवारी रोजी रात्री साडेदहा वाजता अवघ्या वीस मिनिटात घडली. दीपक शशिराव शिंदे (वय 41, रा. कासारवाडी) यांनी याप्रकरणी गुरुवारी (दि. 23) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शिंदे यांनी त्यांची 15 हजार रुपये किंमतीची दुचाकी (एम एच 14/एफडब्ल्यू 2444) कासारवाडी येथील एका हॉटेल समोर पार्क केली. अवघ्या वीस मिनिटात त्यांची दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेली. भोसरी पोलीस तपास  करीत आहेत.

Post a Comment

0 Comments