शिरपूर तालुक्यात गांजाची लागवड , सात लाखांचा माल जप्त

 


शिरपूर तालुक्यातील लाकड्या हनुमान शिवारातील शेतावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने छापा टाकून सात लाख, आठ हजार रुपयांचा गांजा जप्त केला. याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

शिरपूर तालुक्यातील काही ठराविक भाग अमली पदार्थ, प्राणघातक शस्रे, मद्य आणि बेकायदेशीर प्रवासी वाहतूक या प्रकारच्या गुन्ह्यात कायम चर्चेत राहिला आहे. लाकड्या हनुमान शिवारातील एका शेतात गांजासदृश्य वनस्पतीची लागवड झाल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाल्यानंतर पोलिसांनी संबंधित शेतात जाऊन खात्री केली. त्यानंतर सोमवारी सायंकाळी पथकासह शेतावर छापा टाकला.

शिरपूर तालुका पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग यांनी केलेल्या या संयुक्त कारवाईत पथकाने शेतातील गांजाची झाडे मुळासकट उपटून जप्त करण्याची कारवाई सुरू केली. जप्त केलेल्या झाडांची किंमत सात लाख, आठ हजार, ६० रुपये आहे. महेंद्र सपकाळ यांनी दिलेल्या तक्रारीवरून रवी पाडवीविरुद्ध (रा. लाकड्या हनुमान, शिरपूर) रात्री शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.


Post a Comment

0 Comments