कामगारांनी लांबवला चौदा लाखांचा ऐवज

 शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील दिघे वस्ती येथे रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी चोरी करत व्यक्तींवर दगडफेक करत जखमी केल्याची घटना घडली असल्याने 3 अज्ञात चोरट्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

शिक्रापूर (ता. शिरुर) येथील दिघे वस्ती येथे राहणारे सोमनाथ टेमगीरे व सिराज शेख हे १७ फेब्रुवारी रोजी त्यांच्या घरात झोपलेले असताना पहाटे तीन च्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी टेमगिरे व शेख यांच्या घराच्या दरवाजाची कडी उचकटून घरात प्रवेश करुन कपाटात असलेले सोन्याचे दागिने, रोख रक्कम, मोबाईल व काही कागदपत्रे काढून घेतले.

दरम्यान टेमगीरे जागे झाले असता त्यांनी शेजारील नागरिकांना आवाज दिला असता तिघा चोरट्यांनी सोमनाथ टेमगीरे व सिराज शेख यांच्यावर दगडफेक केली.यामध्ये सोमनाथ नानाभाऊ टेमगीरे व सिराज गुलामरसूल शेख हे दोघे किरकोळ जखमी झाले असून याबाबत सोमनाथ नानाभाऊ टेमगिरे (वय ३४) रा. दिघे वस्ती शिक्रापूर (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात 3 चोरट्यांवर गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र बनकर हे करत आहे.


Post a Comment

0 Comments