पाथर्डीच्या घाटात झाडावर आदळली बस , भीषण अपघातात ११ जखमी

 


बुलडाणा - जिल्ह्यातील मेहकर बस स्थानकाहून खामगावकडे निघालेल्या एसटी महामंडळाच्या बसला पाथर्डी घाटामध्ये भीषण अपघात झाला आहे.

अपघातात ११ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मेहकरवरून खामगावकडे जात असलेल्या बसचा पाथर्डीच्या घाटामध्ये अपघात झाला. त्यावेळी, बस रस्त्याकडील झाडाला धडकली. त्यामध्ये, बसच्या समोरील भागाचा चेंदामेंदा झाल्याचे दिसून येते. सुदैवाने कुठलीही जिवीतहानी झाली नाही.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळावर धाव घेतली. त्यानंतर, घटनास्थळावर पोलीस व ॲम्बुलन्सही पोहोचली असून बचाव मदतकार्य सुरू करण्यात आले. गंभीर जखमींना रुग्णालयात नेण्याची प्रक्रिया सुरू होती


Post a Comment

0 Comments