तलावात आढळला तरुणाचा मृतदेह....

 


भंडारा – मागच्या काही दिवसांपासून राज्यात तरुणांच्या आत्महत्येच्या  प्रमाणात वाढ झाली आहे. रोज तरुणांनी आत्महत्या केल्याच्या घटना उघडकीस येत आहेत.

प्रत्येक घटनेतून वेगळं कारण उजेडात येत आहे. भंडारा जिल्ह्यात एका तरुणाचा तलावात मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ माजली होती. बातमी वाऱ्यासारखी पसरल्याने बघ्यांची सुध्दा तिथं गर्दी झाली होती. सुरुवातीला मृतदेह सापडल्यानंतर त्याची ओळख पटवण्यात पोलिसांना मोठी अडचण निर्माण झाली होती. त्यानंतर तिथं उपस्थित असलेल्या लोकांनी त्या तरुणाचे नाव सांगितले.

भंडारा जिल्ह्याच्या तुमसर शहरातील हनुमान तलावात एका तरुणाचा मृतदेह आढळून आल्याची घटना समोर आली आहे. या घटनेची माहिती मिळताच तुमसर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. सदर मृतदेह तलावातून बाहेर काढला. मृतअवस्थेत असलेल्या तरुणाची ओळख पटवून घेतली असून मृत तरुणाचे नाव गोलू उर्फ वेशु दिनेश भोंडे वय 18 रा. शिवाजी नगर तुमसर असे आहे. हनुमान तलावातील पात्रात पाण्यात बुडून तरुणाचा मृत्यू झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली असून तरुणाचा मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून पुढील तपास तुमसर पोलीस करीत आहेत.

ज्या ठिकाणी तरुणाचा मृतदेह सापडला त्या ठिकाणी जाऊन पोलिसांनी चौकशी केली. त्याचबरोबर घटनास्थळी संशयास्पद काही गोष्टी आढळून येतात का हे सुध्दा पाहिलं आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी देण्यात आला आहे. त्यानंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार असून वैद्यकीय अहवाल आल्यानंतर पोलिस पुढील तपास करणार आहेत.


Post a Comment

0 Comments