भरधाव दुचाकी झाडावर आदळून दुचाकीस्वार ठार

 


कोरेगाव - कोरेगाव-सुलतानवाडी रस्त्यावर भरधाव वेगाने दुचाकी चालवताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्याकडील पिंपरणीच्या झाडावर आदळून गोडसेवाडीतील एकाचा मृत्यू तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली 

अपघातात सचिन बबन गोडसे (वय 38, गोडसेवाडी, ता. कोरेगाव) यांचा मृत्यू झाला तर मनोहर विठ्ठल गोडसे (वय 35) हे गंभीर जखमी झाले आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मंगळवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास सचिन गोडसे आणि मनोहर गोडसे हे दोघेजण बजाज प्लॅटिना मोटार सायकल (क्रमांक एमएच 11 डीएफ 7369) वरून कोरेगाववरून सुलतानवाडीला भरधाव वेगाने चालले होते. दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने सुलतानवाडी रस्त्यावरील संभाजीनगर परिसरात रस्त्याच्या कडेला असलेल्या पिंपर्णीच्या झाडावर त्यांची दुचाकी जोराने आदळली. त्यामध्ये दुचाकी चालवणारा सचिन गोडसे यांचा मृत्यू झाला.

त्याच्या पाठीमागे बसलेले मनोहर गोडसे हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमीला सातारा येथील जिल्हा शासकीय रुग्णाल्यात उपचारार्थ दाखल केले आहे. या घटनेची फिर्याद बाळासो सीताराम गोडसे (रा. गोडसेवाडी) यांनी दिली आहे. कोरेगाव पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद झाली असून सहायक पोलीस निरीक्षक अर्चना शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार कुंभार तपास करत आहेत.


Post a Comment

0 Comments