कौटुंबिक वादाला कंटाळून पतीने केली पत्नीची हत्या

 


धुळ्यामध्ये पती - पत्नीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. यामध्ये कौटुंबिक वादातून महिलेची दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली आहे.

धुळे शहरातील साक्री रोडवरील यशवंत नगर या ठिकाणी हि घटना घडली आहे. दिपालीचा पती नागेश दगडू कानडे यानेच भरदिवसा आपल्या पत्नीवर धारदार हत्याराने वार करून तिला जखमी केले. यानंतर दीपालीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र रुग्णालयात उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. 

काल दुपारी साक्री रोड परिसरात असलेल्या यशवंत नगरमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. किरकोळ वादातून नागेश कानडे याने धारदार शस्त्राने पत्नी दिपालीच्या डोक्यात धारधार शस्त्राने वार केल्यामुळे ती गंभीर जखमी झाली. जखमी दीपालीला तातडीने उपचारांसाठी दिर गणेश दगडू कानडे यांनी हिरे वैद्यकीय शासकीय जिल्हा रुग्णालय येथे दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. 

या घटनेची माहिती मिळताच धुळे शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांनी घटनास्थळी धाव घेतली.
यानंतर त्यांनी आरोपी पती नागेश कानडेला अटक केली.
नागेश दगडू कानडे आणि दिपालीचा आठ वर्षांपूर्वी आंतरजातीय विवाह झाला होता. त्यांना एक मुलगासुद्धा आहे.
मागच्या काही महिन्यांपासून नागेश कानडे याचे मानसिक संतुलन बिघडले असल्याचे
परिसरातील नागरिकांकडून सांगण्यात आले आहे.


Post a Comment

0 Comments