ज्या प्रेमासाठी सना बनली सोहेल , त्या प्रेमानेच दिला १०० वोल्टचा झटका

 


उत्तर प्रदेशच्यामध्ये राहणाऱ्या दोन मुली एकमेकांच्या प्रेमात पडल्या. यामध्ये एकीने स्वत:चे जेंडरसुद्धा चेंज केले. पुरुष बनल्यानंतर दुसऱ्या मुलीने मात्र धोका दिल्याची घटना समोर आली आहे.

प्रकरण कोणालाही एखाद्या चित्रपटापेक्षा कमी वाटणार नाही. सध्या या प्रकरणाची एकच चर्चा रंगली आहे. 

बबीनाच्या खैलार येथे राहणारी सना खान एक प्राथमिक स्वास्थ्य केंद्रात एएनएम पदावर काम करायची. 2016 मध्ये त्यात बिल्डींग मध्ये राहणाऱ्या सोनल श्रीवास्तवसोबत तिची मैत्री झाली. धीरे-धीरे ही मैत्री प्रेमात बदलली. दोघींनी लग्न करण्याचाही निर्णय घेतला. 2017 ला सना आणि सोनलने घर सोडलं आणि दोघी एकत्र राहायच्या.

सनाने सांगितल्याप्रमाणे सोनलच्या कुटूंबाने एकत्र राहत असल्याने पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर दोघी लिव इन रिलेशनशिपमध्ये राहायला लागल्यात

यानंतर सनाने स्वत:चं लिंग चेंज करण्याचा निर्णय घेतला. दिल्लीच्या सर गंगाराम हॉस्पिटलमध्ये तिने काउंसिलिंग केली. जून 2020 मध्ये सनाचे मुलीतून पुरुषात रुपांतर झाले. जवळपास 10 तासाच्या सर्जरीनंतर सना सोहेल खान बनली. सना उर्फ सोहेल खानने सांगितल्याप्रमाणे ऑपरेशननंतर बॉडीला रिकवर होण्यात एक वर्ष लागलं.

मात्र या प्रेमकहाणीचा हा एन्ड नव्हता. पुढे एप्रिल 2022 मध्ये सोनलला एका हॉस्पिटलमध्ये नोकरी लागली. तिथे काम करणाऱ्या एका मुलाशी तिचे प्रेमसंबंध जुळले. त्यानंतर सना म्हणजेच सोहेल खानला सोनलच्या वागणूकीत खूप बदल जाणवला. जेव्हा सोहेलने नोकरी सोडण्यासाठी म्हटले तेव्हा सोनलने नकार दिला.

यानंतर सोनल आणि सोहेलमध्ये सतत खटके उडायचे. एवढंच काय तर वाद इतका विकोपाला गेला की नंतर हे प्रकरण कोर्टात केले. सोनल को अटक करुन कोर्टासमोर सुनावणीसाठी बोलावले होते आणि तिला जामीन मिळाला.


Post a Comment

0 Comments