अपघातातील जखमी वीज कर्मचाऱ्याचा मृत्यु

 


तालुक्यातील धामोरी येथील वीज कर्मचार्‍याचा अपघाती मृत्यू झाला. या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.

महावितरणच्या करंजी (ता. शेवगाव) उपविभागातील लाईनमन व वीज तांत्रिक कामगार सहकारी संघटनेचे माजी अध्यक्ष माधव कारभारी पटारे गेल्या महिन्यात कामावरून घरी परतताना तिसगावजवळ पुलाजवळ एका अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले होते.

स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने त्यांना नगर येथील खासगी रुग्णालयात दाखल केल्यानंतर पुढील शस्त्रक्रियेसाठी त्यांना पुणे येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले होते. उपचार घेताना त्याची प्राणज्योत मावळली. त्यांच्यामागे आई, पत्नी, एक मुलगी, एक मुलगा, भाऊ असा परिवार आहे.


Post a Comment

0 Comments