गुटख्याच्या पिशवीत 40 हजार डॉलर्स

 


सामानाची तपासणी करीत असताना एका अधिकाऱ्याला संशय आला. त्याने संपुर्ण बॅगेची चौकशी केली, त्यावेळी त्याला बॅगेत गुटखा सापडला.

त्यानंतर गुटख्याच्या पिशवीत अधिकाऱ्यांना 40 हजार डॉलर्स सापडले आहेत. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर  अधिक व्हायरल झाला आहे. खरंतर हास्यास्पद गोष्ट आहे. परंतु ज्यावेळी गुटख्याच्या पिशवीत 40 हजार डॉलर्स सापडले त्यावेळी चौकशी करणारे अधिकारी सुध्दा घाबरले.

सदर घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर एका अधिकाऱ्याने शेअर केला आहे. त्यामध्ये अधिकारी गुटख्याची प्रत्येक पुडी फोडताना दिसत आहेत. प्रत्येक पुडीतून पैसे काढले जात आहेत. प्रत्येक पुडीत पैसे असल्यामुळे अधिकाऱ्यांची सुध्दा चांगलीचं तारांबळ उडाली.

बॅकॉंकला निघालेल्या त्या व्यक्तीची कसून चौकशी सुरु आहे. त्याचबरोबर त्यांच्यासोबत आणखी कितीजण आहेत, याची सुध्दा माहिती शोधण्यात पोलिस व्यस्त आहेत.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलेली व्यक्ती बॅंकॉकला जात होती. कस्टम अधिकारी चौकशी करीत असताना ज्यावेळी गुडख्याच्या पुड्या फाडल्या जात होत्या. त्यावेळी डॉलर बाहेर येतं होते. सगळ्या पुड्या फाडण्यात आल्या, त्यावेळी त्यात 40 हजार डॉलर्स सापडले.

Post a Comment

0 Comments