संपत्तीचा वाद टोकाला गेला , मुलानेच वडिलांचा' असा, काटा काढला !

 


संपत्तीच्या वादातून मुलानेच वडिलांची हत्या केल्याची घटना बिहारमधील नालंदा येथे घडली आहे. मुलगा एवढ्यावरच थांबला नाही.


हत्या केल्यानंतर बापाचा एक डोळाही फोडला. बिहारमधील नालंदा जिल्ह्यातील देकपुरा गावात ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच रहुई पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करत मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. घटनेनंतर आरोपी फरार झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. किशोर सिंह असे हत्या करण्यात आलेल्या पित्याचे नाव आहे. जितेंद्र सिंह असे हत्या करणाऱ्या आरोपी मुलाचे नाव आहे 

किशोर सिंह यांचे त्यांचा मुलगा जितेंद्र सिंह याच्याशी संपत्तीवरुन वाद सुरु होता. किशोर यांनी छोटा मुलगा आकाश यालाही घरातून हाकलून दिले होते. रात्रभर पिता-पुत्रांचा संपत्तीवरुन वाद सुरु होता.

वादानंतर जितेंद्रने वडिलांची हत्या केली. मग डोळाही फोडला. यानंतर तो तेथून पळून गेला. घटनेची माहिती मिळताच रहुई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला. मृतदेह ताब्यात घेत बिहारशरीफ सदर रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला.

यावेळी पोलिसांनी नातेवाईकांची चौकशी केली. चोरीच्या उद्देशाने आलेल्या दोघांनी किशोर सिंह यांची हत्या करुन फरार झाल्याचा बनाव केला. मात्र सत्य पोलिसांसमोर आलेच. पोलीस फरार आरोपीचा शोध घेत आहेत.

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, जितेंद्र हा मनोरुग्ण होता. तो आपल्या पत्नीला दररोज बेदम मारहाण करायचा. यामुळेच त्याची पत्नी त्याला सोडून गेली हेता. पोलिस आरोपीला अटक करण्यासाठी ठिकठिकाणी छापेमारी करत आहेत.

Post a Comment

0 Comments