पार्कमध्ये पुस्तक वाचताना आला भला मोठा साप , तर मुलीने चक्क मांडीवर घेऊन गोंजारले

 


सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. कुत्रा, मांजरीसारख्या पाळीव प्राण्यांचे व्हिडीओ तर असतातच. पण हल्ली भयावह वाटणाऱ्या जंगली प्राण्यांचे व्हिडिओही मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असतात.

प्राण्यांशी संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर विशेष पसंत केले जातात. असाच एक सापाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सहसा, जंगली प्राण्यांच्या माणसांवरील हल्ल्याचे किंवा त्यांच्या दहशतीचे व्हिडिओ इंटरनेटवर वर्चस्व गाजवतात. पण सापाचा हा व्हिडिओ जरा वेगळा आहे.

यामध्ये साप ना कोणाला घाबरत आहे, ना कोणाशी भांडत आहे. व्हिडिओमध्ये हा भला मोठा सॅप एका मुलीच्या मांडीवर सहज स्थिरावला आहे आणि ती मुलगी त्याला गोंजारत आहे.

झी न्यूजने दिलेल्या माहितीनुसार, व्हिडीओमध्ये एक मुलगी पार्कसारख्या एका ठिकाणी बसलेली आहे. ती मुलगी या ठिकाणी बसून पुस्तक वाचत आहे.

मुलगी आणि पुस्तकापर्यंत ठीक होते. पण त्यानंतर एक साप तिच्या मांडीवर स्थिरावलेला दिसतो. हे दृश्य पाहून तुम्हालाही घाम फुटेल. कारण या सापाचा आकार छोटा नाही तर खूप मोठा आहे.

यानंतर व्हिडिओमध्ये अगदी अनपेक्षित दृश्य दिसते. यानंतर मुलगी त्या महाकाय सापाला मिठी मारते, त्याला न घाबरता स्पर्श करते. या मुलीला पाहून असे वाटते की तिला साप कसे हाताळायचे हे चांगलेच माहित आहे. एवढ्या मोठ्या आकाराचा भयंकर साप पाहिल्यावर कुणीही घाबरेल.

परंतु या मुलीने साप आपल्या जवळ घेतले आहे. सापाच्या हल्ल्याने मुलीचा जीव धोक्यात येऊ शकतो.

व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ अनेक लोकांनी पहिला असून याला काही दिवसांतच हजारो लोकांनी लाइकही केले आहे. कमेंट सेक्शनमध्ये लोक त्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया पोस्ट करून भीती आणि आश्चर्य व्यक्त करत आहेत.

Post a Comment

0 Comments