भररस्त्यात विद्यार्थ्यावर गावगुंडाकडून शस्त्राने वार

 


सिडको परिसरात टवाळखोर व गावगुंडांची दहशत कमी होत नसून अंबड पोलिसांचा वचकच राहिला नसल्याचा आरोप स्थानिकांमधून करण्यात येत आहे.

उत्तमनगर परिसरातील महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या युवकाचा घरी जात असताना धक्का लागल्याच्या कारणावरून चार ते पाच जणांच्या टवाळखोरांच्या टोळक्याकडून या विद्यार्थ्याला शिवीगाळ करीत मारहाण करण्यात आली.

काही प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीनुसार सदर विद्यार्थी जीव मुठीत घेऊन धावत असताना हे गावगुंड मात्र हातात हत्यार घेऊन त्याचा पाठलाग करत होते. त्यांनी धारदार शस्त्राने विद्यार्थ्यास गाठत त्याच्यावर हल्ला केला. विद्यार्थ्यांच्या डोळ्याच्या खाली वार झाल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला.

हा प्रकार भर रस्त्यावर सुरू असल्याने येथे दहा ते पंधरा मिनिटे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती. मारहाण करताच गावगुंडानी घटनास्थळाहून पळ काढला. यानंतर मात्र स्थानिक रहिवाशांनी पुढाकार घेत सदर युवकाला खासगी रुग्णालयात दाखल केले.

अंबड पोलिस ठाण्यापासून जवळच असलेल्या घटनास्थळी पोलिस मात्र त्वरित न पोचल्याने पोलिसांच्या कामगिरीबाबत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत अंबड पोलिसात कोणताही गुन्हा दाखल झालेला नसल्याची माहिती कळत आहे.

Post a Comment

0 Comments