पतंग उडविताना विहिरीत पडल्याने एकुलत्या एक मुलाचा मृत्यू

 


पतंग उडविताना विहीरीत पडल्याने १२ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला

घटना हिंगोणे खुर्द ता.धरणगाव येथे रविवारी दुपारी घडली. अक्षय संजय महाजन असे या मृत बालकाचे नाव आहे. रविवारी दुपारी तो पतंग उडवित होता. गावाजवळच जमिनीला समतोल असणाऱ्या विहिरीचा अंदाज न आल्याने तो विहिरीत जाऊन पडला. त्यातच त्याचा मृत्यू झाला.

अक्षय हा संजय माधव महाजन यांचा एकुलता मुलगा होता. तो हिंगोणें बुद्रुक येथील अंजनी विद्यामंदिरात सहावीत शिक्षण घेत होता. त्याला इन्स्टाग्रामवर व्हिडीओ बनविण्याचा छंद होता. रविवारी दुपारीच त्याने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ अपलोड केला होता. तो त्याचा शेवटचा व्हिडीओ ठरला.


Post a Comment

0 Comments